Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्रंबकेश्वरमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी देतात उघड्या छपराखाली सेवा; कोसळणाऱ्या पावासाचा सेवेत येतो व्यत्यय

Trimbakeshwar
त्रंबकेश्वर , मंगळवार, 11 जुलै 2023 (07:23 IST)
In Trambakeshwar doctors and staff provide open-air services जून महिन्याच्या दुसऱ्या आठव ड्यात  वादळी हवा सुरू होती त्या हवेने घरांचे छप्पर उडण्याच्या घटना घडल्या.त्यामध्ये संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात शासनाच्या आपला दवाखाना  थाटलेल्या इमारतीचे छप्पर उडाले .सुदैवाने त्यात कोणाल इजा झाली नाही.मात्र अद्यापही छताचे पत्रे लटकलेल्या अवस्थेत असून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
 
दरम्यान एक महिना झाला उघड्या छप्पराखाली  येथे वैद्यकीय पथकाला काम करावे लागत आहे. पाऊस सुरु असताना अत्यंत दयनीय अवस्था होत असते.सुरुवातीला चार दिवस हा दवाखाना बंद ठेवला मात्र दुसऱ्या इमारतीची सुविधा उपलब्ध झाली नाही.अखेर आहे तेथेच काम झुरू झाले आहे.
 
ञ्यंबकेश्वर येथे महाराष्ट्र शासनाने आपला दवाखाना सुरू केला आहे.ञ्यंबक शहरात सरकारी उपक्रम राबविण्यासाठी जागा आणि इमारती शिल्लक राहीलेल्या नाहीत.पालिकेने व्यावसायिक गाळे आणि इमारती भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत.धर्मशाळा ठेकेदारीने दिलेल्या आहेत.मोकळे भुखंड अतिक्रमणांनी व्यापलेले आहेत.
 
राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या रेटयामुळे 1 मे महाराष्ट्र दिनास आपला दवाखाना सुरू करण्यासाठी 1972 च्या दुष्काळात बांधलेले धान्य गोदाम उपलबध्द करून देण्यात आले.दगडी बांधकामातील या गादामाची दुरावस्था झालेली आहे. मात्र दवाखान्यासाठी रंगरंगोटी करून ते सजवण्यात आले.दरम्यान बुधवारी वादळी वा-यांनी हे छप्पर उडवले आहे.भिंती देखील कोसळु शकतात.
 
याबाबत उदघाटनाच्या वेळेस शहरातील उपस्थित ग्रामस्थांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.येथील वैद्यकीय पथक आणि उपचारासाठी आलेले रूग्ण यांच्या जीवाशी होणारा खेळ पाहता याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्नीने मुलांच्या मदतीने पतीची हत्या