Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही घाला बंदी : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त

devendra fadnavis
, गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (08:00 IST)
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर भारत सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित आठ संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील प्रतोद कोडिकुन्निल सुरेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) बंदी घालण्याची मागणी केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस  यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
कोडिकुन्निल सुरेश यांनी आरएसएसची पीएफआयशी तुलना करताना या दोन्ही संघटना सारख्याच असून, दोघांवरही बंदी घातली गेली पाहिजे, अशी मागणी केली. आम्ही आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करत आहोत. पीएफआयवर बंदी घालणे हा काही उपाय नाही. आरएसएससुद्धा संपूर्ण देशात हिंदू जातियवाद पसरवत आहे. आरएसएस आणि पीएफआय दोघेही सारखेच आहेत. त्यामुळे सरकारने दोघांवरही बंदी घातली पाहिजे. केवळ पीएफआयवर बंदी कशासाठी? अशी विचारणा सुरेश यांनी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ind vs SA t20 2022:भारताने पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सने पराभव केला