Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 18 March 2025
webdunia

त्र्यंबकेश्वरला तिसऱ्या सोमवारच्या फेरीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी

Trimbakeshwar
, सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (20:47 IST)
त्र्यंबकेश्वर  :- बम बम भोले, हर हर महादेव म्हणत हजारो भाविक तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत आहेत.  काल सायंकाळपासून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.
 
खासगी वाहनाने आलेल्या भाविकांची वाहने खंबाळे येथे उभी करण्यात आली व तेथून एस टी बसने प्रवास करत भाविक त्र्यंबकला पोहोचले. काहींनी बस स्थानकात उतरताच तेथूनच फेरीला सुरुवात केली तर काहींनी कुशावर्तात स्नान करून मंदिराच्या समोरून जात बाहेरून दर्शन घेतले व फेरीला सुरुवात केली.
 
डमरू डफ वाजवत भोलेनाथाचा गजर करत फेरीचा आनंद घेत आहेत. बस स्थानकात टाकलेल्या खडीने अनेकांना जखमा झाल्या आहेत. रस्त्यावर असलेल्या अडथळ्यांनी गावा बाहेर पडताना भाविकांची दमछाक झाली. जागोजागी चहा, फराळ वाटप करण्यात येत होते. भाविकांनी द्रोण रस्त्यावर फेकल्याने चिकट झालेल्या रस्त्यावर काही भाविक पडून जखमी झाले. शहरात गर्दीचा उच्चांक झाला होता.

Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : लाच घेणाऱ्या मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे सापडली "इतकी" बेहिशोबी मालमत्ता