Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रावणी सोमवारी पहाटे ४ वाजेपासून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेता येणार

Trimbakeshwar
, बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (21:37 IST)
नाशिक : श्रावणात प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे चार वाजताच दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. तर सोमवार वगळता इतर दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे.
 
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर देशाचा विविध भागातून भाविकांचा राबता असला तरी श्रावणात मात्र भाविकांच्या संख्येत नेहमीपेक्षा अधिक वाढ होते. त्यामुळे श्रावणात वाढणार्‍या गर्दीचे नियोजन देवस्थानला करावे लागते. रांगेत उभे असलेल्या प्रत्येक भाविकाला दर्शन होईल, त्यांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यांची गैरसोय होणार नाही, याकडे देवस्थानकडून लक्ष देण्यात येत असते. त्या दृष्टीने अनेक व्यवस्था यंदा देवस्थानकडून मंदिराच्या आवारात करण्यात येत आहेत.दर्शनात कोणत्याही प्रकारचा अडथळे येऊ नये, यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी उघडण्याची वेळ पहाटे पाच ते रात्री नऊ अशी करण्यात आली आहे.
 
परंतु श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांची संख्या अधिक वाढत असल्याने मंदिर पहाटे चार वाजताच उघडण्यात येणार आहे. त्र्यंबक शहरातील स्थानिकांना मंदिर उघडल्यापासून सकाळी १०वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत दर्शन घेता येईल. स्थानिकांनी दर्शनासाठी येतांना स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था तर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तब्बल 6 किमी डोंगराळ पायवाटेने गर्भवतीला 3 महिलांनी डोलीतून नेले दवाखान्यात