Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

nivruthinath
नाशिक, ञ्यंबकेश्वर , बुधवार, 18 जानेवारी 2023 (21:49 IST)
18 जानेवारी आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून पौषवारी निमित्ताने लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. आज पहाटे संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधीची महापूजा करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे सपत्नीक उपस्थित राहीले.  या महापूजेस आमदार हिरामण खोसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महापूजा झाल्या नंतर सभामंडपात पालकमंत्री यांनी विश्वस्तांसह स्थानिक पदाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी आचारसंहिता असल्याने थेट भाष्य करण्याचे टाळले. आचार संहिता संपल्या नंतर विश्वस्त आणि पदाधिकारी यांची बैठक घेऊन विचारविनीमय करण्याचे संकेत त्यांनी दिले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मालेगावी इन्कम टॅक्सचा छापा; महामार्गावरील कत्तल करणार्‍या कंपनीवर आयकरने छापा