बेलखंडी मठ जमीन गैरव्यवहार प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे. शिवाय, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले आहे.
यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अवघ्या दोन शब्दात आपली प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली आहे. “सत्यमेव जयते!” असे धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर म्हटले.