लातूर जिल्ह्यात वातावरण उत्तम आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही कॉंग्रेस लढत आहोत. मात्र भाजप सरकारच्या कामाबाबत आम्ही जनतेसमोर जनजागृती केली. या निवडणुकीत जनता पुन्हा कॉंग्रेसला पसंती देईल. अध्यक्षपदाचा निर्णय श्रेष्ठी घेईल, श्रेष्ठींचा निर्णय आम्हाला मान्य आहे. निवडून आल्यावर आमच्या पक्षाचे श्रेष्ठींचा निर्णय आमच्यासाठी शिरसावंद्य आहे असे कै . माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे सुपुत्र धीरज देशमुख यांनी सांगितले आहे. निवडणुकीत रितेश देशमुख यांची उणीव जाणवली याबाबत प्रश्न विचारला असता ते आमच्या सोबतच आहेत असे ते म्हणाले. रितेश स्टार प्रचारक तर आहेतच. पण या निवडणुकीतले खरे स्टार प्रचारक आ. दिलीपराव देशमुख आणि आ. अमित देशमुख आहेत असं धीरज म्हणाले. आम्ही घराणेशाही करतो हा माध्यमांचा आरोप आहे असं धीरज देशमुख यांनी मत व्यक्त केले आहे.