छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मराठवाड्यासाठी महत्वाच्या घोषणा केल्या. तसेच यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आले नाहीत का? असा खोचक सवाल करत टोला लगावला.
दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. संजय राऊतांनी उपस्थित राहणार असे जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांची परिषद वादळी ठरण्याची चर्चा सुरु होती.
मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरपत्रकार परिषदेत राऊत आले नाहीत का? असा सवाल करत टोला लगावला.
संजय राऊत काय म्हणाले होते?
मुख्यमंत्र्याच्या मराठवाड्यातील पत्रकार परिषदेत संधी दिल्यास एक पत्रकार म्हणून उपस्थित राहू. समोरासमोर प्रश्न विचारू. आम्ही देखील पत्रकार आहोत. पोलिसांनी अडवले नाही तर मी पत्रकार परिषदेत जाईन, असे ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी जाहीर केले होते. तसेच पत्रकार म्हणून प्रश्न विचार असल्याचे जाहीर केले होते.
Edited By - Ratnadeep Ranshoor