Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिर्डीमध्ये साईभक्तांची गर्दी होण्याची शक्यता गृहित धरत जिल्हा प्रशासन अॅलर्ट

शिर्डीमध्ये साईभक्तांची गर्दी होण्याची शक्यता गृहित धरत जिल्हा प्रशासन अॅलर्ट
, मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (08:46 IST)
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिर्डीमध्ये साईभक्तांची गर्दी होण्याची शक्यता गृहित धरत जिल्हा प्रशासन अॅलर्ट झाले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबत शिर्डी संस्थानसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवून त्याचे योग्य नियोजन करा, असे निर्देश या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच शिर्डीत २५ ते ३१ डिसेंबर याकाळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील दिला जाणार आहे.  
 
सध्या मंदिरात जाण्यासाठी चार प्रवेशद्वार असून पार्किंगची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रसादालय सुरू आहे. मात्र नाताळपासून शिर्डीत गर्दी होण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त द्या, अशी मागणी बैठकीत संस्थानच्यावतीने करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी भोसले यांनी पुढील काही दिवस शिर्डीत अतिरिक्त बंदोबस्त देण्यात यावा, अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच शिर्डीत अवजड वाहने येणार नाहीत, यासाठी बायपास रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. गर्दी न करता करोना अनुषंगाने असलेल्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
 
राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री अकरा ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले, 'राज्य सरकारचा संचारबंदी बाबत निर्णय आला आहे. त्यानुसार आता आम्ही नियोजन केले असून नगर जिल्ह्यामध्ये पालिका क्षेत्रात संचारबंदीचे पालन केले जाईल.'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युकेवरून येणाऱ्या प्रवाशांची अशी घेतली जाणारी काळजी, एकही जण घरी सोडला जाणार नाही