पूरग्रस्तांना मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (09:34 IST)
कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तांना मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी सरसावले आहेत. सामाजिक बांधिलकीचा हात देत जिल्हा न्याय संकुलात 76 कुटुंबांची व्यवस्था केली आहे. लहान मुले, महिला, अबाल वृध्द 321 नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने कसबा बावडा परिसरातील नागरिकांची जिल्हा न्याय संकुलात हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधिश एन.व्ही. नावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना मदत करण्यात येत आहे. स्थलांतरित नागरिकांना सकाळच्या नाष्टयापासून दोनवेळचे जेवण, वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहे. डॉक्टरांचे वैद्यकीय पथक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून जात आहे. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. पंकज देशपांडे, अतिरिक्त मुख्य न्यायाधिश एच.एस.भुरे, सर्व न्यायाधिश,ॲड. आनंद चव्हाण, न्यायालयीन कर्मचारी पूरग्रस्तांना मदतीसाठी कार्यरत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मराठा समाजचे आंदोलन स्थगित, पुरग्रस्तांना मदत करणार