महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २४ ऑगस्टला

शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (08:59 IST)
पश्चिम महाराष्ट्रात महापूराने पूर्वनियोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ११ ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता नव्या वेळेनुसार २४ ऑगस्टला परीक्षा होणार आहे. 
 
कोल्हापूरसह सांगली आणि साताऱ्यामध्ये भीषण परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग चार सुद्धा ठप्प झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला आहे. हजारो जनावरे पाण्यातून वाहून गेली आहेत. सांगलीमध्ये  निम्मे शहरात पाण्यात गेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख जम्मूमधून जमावबंदी हटवण्यात आली