Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपराजधानीत युवकाचा हात पाय बांधून खून नागपूर हादरले

webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (15:18 IST)
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. डोबी नगर येथे हा खून झाला आहे. या थरारक हत्येमुळे परिसरात खळबळ उडली असून नागरिक भयभीत झाले आहेत. मृतकाची ओळख पटली नसून हत्येच कारणही अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या हत्येचा अधिक तपास करत आहेत.
 
ही हत्या काल (8 ऑगस्ट) रात्री झाली आहे असे पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. यातील भयानक गोष्ट म्हणजे मृत युवकाचे हात पाय बांधून गळा कापण्यात आला आहे. या धक्कादायक हत्येमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे. हत्या कुणी केली? का केली? याचा शोध अजनी पोलीस घेत आहेत.
 
मागील काही दिवस नागपूरमधील गुन्ह्यांत भयानक वाढ होत आहे. मागील महिन्यात नागपूरमध्ये एका मॉडलची निर्घुण हत्या करण्यात आली होती. ही हत्या तिच्या प्रियकराने केली असल्याचे समोर आलं होतं. प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरुन प्रियकराने तिचा खून केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असल्याने या हत्या आणि इतर बेकायदा कामे रोखण्याचे पोलिसांपुढे मोठे आवाहन आहे. 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

हशीम अमलानं जेव्हा वनडेत विराट कोहलीला टक्कर देणारी कामगिरी केली...