Diwali Bonus राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळी भाऊबीज बोनस मंजूर केला आहे. बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी ३७ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिली.
या मानधन तत्वावरील कर्मचार्यांना 2023 24 या आर्थिक वर्षात दिवाळी भाऊबीज भेट देण्यास शासनाने 18 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन आदेशान्वये मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
तटकरे म्हणाल्या की शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हेच लक्षात शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत.
या बाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.