Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीसाठी राज्य सरकारची 'अशी' आहे नियमावली

दिवाळीसाठी राज्य सरकारची 'अशी' आहे नियमावली
, शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (08:18 IST)
राज्यात कोरोनाचे संक्रमण कमी झाले असले तरी खबरदारीचे उपाय राबविले जात आहेत. याआधी गणेशोत्सव, रमजान ईद, नवरात्रोत्सव या सणावेळी जनतेने सरकारचे नियमांना पाठिंबा दिला. तसेच साधेपणाने हे सण साजरे केले. त्या अनुषंगाने आता दिवाळीसाठीही राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. दिवाळी सण साधेपणाने साजरा करताना नागरिकांनी फटाके टाळून दिव्यांची आरास लावण्यावर भर देण्यास सांगितले आहे.
 
राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्येष्ट नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी स्वतःहूनच फटाक्यांचा कमी वापर करण्यास सांगितले गेले आहे. राज्य सरकारने सहा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ती खालील प्रमाणे…
 
१) राज्यात प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे दिवाळीही अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करावी.
 
२) नागरिकांनी गर्दी टाळावी. मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
 
३) दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच उत्सव काळात नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लहान मुलांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे.
 
४) दिवाळीदरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उत्सव वा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करण्यात येऊ नयेत. असा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक अशा माध्यमांतून करावा.
 
५) फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोनाचे संक्रमन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा.
 
६) कोविड १९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे संबंधित विविध विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेलार यांनी तीन ट्विट करत संजय राऊत यांना टोला