Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करू नका

do not cut power
, मंगळवार, 24 मार्च 2020 (09:43 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी "महावितरणला" दिले आहेत. ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मीटर रिडींग करण्यासाठी तसंच देयकाचं वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी, आजपासून पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये, असे निर्देश राऊत यांनी दिले आहेत. सोबतच या कालावधीत थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेशही देण्यात आला आहे. 
 
या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी देयक पाठवण्याची सूचना देण्यात आली आहे. या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही. तथापि महावितरणच्या संकेतस्थळावर देयकं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर देयकाबाबतचा एसएमएस पाठवण्यात येईल अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री