Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालात का?

sanjay raut
, शनिवार, 7 जानेवारी 2023 (09:35 IST)
राणेंवर कुठला अग्रलेख लिहिलाय? नारायण राणेंसारखा डरपोक आणि पळपुटे आम्ही नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही. कोणाला हिंमतीच्या आणि धाडसाच्या गोष्टी बोलता. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या जर देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंना इशारा दिला आहे. 
 
संजय राऊत म्हणाले की, माझ्या नादाला लागू नका, राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग मी दाखवतो. झाकली मूठ सव्वालाखाची. हे काय मला जेलमध्ये पाठवणार, मी हिंमतीने माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलोय. तुमच्यासारखा पळून गेलो नाही. ईडीने बोलवल्यावर शरणागती पत्करली नाही. नामर्द नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत असं त्यांनी सांगितले. 
 
त्याचसोबत मला जेलमध्ये घाला, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालात का? या सर्वांची माझ्याकडे नोंद आहे. ते सगळं चीफ जस्टीस ऑफ इंडियाला पाठवली आहे. इकडच्या प्रत्येकाचं वक्तव्य़ आम्ही पाठवत आहोत. नारायण राणेंची सगळी आर्थिक प्रकरणं काढली तर ते ५० वर्ष सुटणार नाहीत असा इशाराही संजय राऊत यांनी नारायण राणेंना दिला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले..