Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असा आहे मुंबईत मेट्रो सेवेचा दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक

mumbai metro
, शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (21:57 IST)
मेट्रो मार्ग २ अ आणि ७ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी फेज १ आणि २ या दोन्ही मार्गिकांमध्ये एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करणं गरजेचं आहे. या प्रणालीची अंमलबजावणी आणि चाचणी करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेल्या पहिल्या टप्प्यांतील सेवा बंद करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने ८ जानेवारी रोजी सकाळी ६ पासून रात्री १० वाजेपर्यंत दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध नसेल.
 
मेगाब्लॉक दरम्यान पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम, पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमसह रोलिंग स्टॉक यांसारख्या सिस्टीमची एकात्मिक चाचणी करणे. दुसऱ्या टप्प्यात चाचणी होत असलेल्या तसेच वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रणाली सोबत पहिल्या टप्पा संरेखित करणे. प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी संपूर्ण प्रणालीची अखंडता आणि सुरक्षितता तपासणे अशी कामे केली जातील. दरम्यान, प्रकल्पाची संपूर्ण स्थापत्य तसेच प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत. लवकरच मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. ही मार्गिका पादचारी पुलाद्वारे मेट्रो मार्ग १ सोबत जोडली गेल्यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चित्रा वाघ यांना नोटीस, म्हणाल्या माझी लढाई अशीच सुरूच राहणार