Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणात डॉ. मुढे सह सर्व दोषींना १० वर्ष सक्त मजुरी आणि ५० हजाराच्या दंड

परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणात डॉ. मुढे सह सर्व दोषींना १० वर्ष सक्त मजुरी आणि ५० हजाराच्या दंड
देश आणि राज्यभर गाजलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणात बीड जिल्हा न्यायालयाने मोठा  निकाल दिला. या प्रकरणात न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे यांना दोषी ठरवले असून, डॉ. मुंडेची पत्नी सरस्वती मुंडे, पिडीतेचा पती महादेव पटेकर हे सुद्धा यात दोषी आढळून आले असून, न्यायालयाने डॉ. मुंडे यांनी स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता असे मत नोंदवत सर्व दोषींना १० वर्ष सक्त मजुरी आणि ५० हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.

या महत्वपूर्ण प्रकरणात मृत विजयमाला पट्टेकर यांचे नातेवाईक फितूर झाले.  कोर्टाने मुंडे याच्या दवाखान्यातून मिळालेली कागदपत्रे, मुंडे हॉस्पिटलची तपासणी केल्या नंतर १० बेडची परवानगी असताना आढळून आलेल्या ६० रूम्ससह ११० बेड आदी परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरले आहेत. सोबतच  मुंडे याने स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता असे मत न्यायलयाने  नोंदवले आहे.

आरोपी मुंडे दांपत्याने वय जास्त आहे आणि विविध आजार जडलेली आहेत याचे कारण देत शिक्षेपासून केलेला बचाव कोर्टाने सफशेल   फेटाळला आहे. यामध्ये मुंडे दांपत्य आणि विजयमाला पट्टेकर यांचा पती आरोपी महादेव पट्टेकर या तिघांना कलम ३१२, ३१४, ३१५, ३१८ तसेच एमटीपी कायद्याखाली १० वर्ष सक्त मजुरी आणि ५० हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत सविस्तर अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील अ‍ॅड.मिलिंद वाघिरकर यांनी दिली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार पुन्हा लोकसभा लढवण्याची शक्यात म्हणाले विचार करतोय