Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chandrpur : चंद्रपूर मध्ये चालक विरहित कारची निर्मित केली,हायड्रोजन धावणार

Chandrpur : चंद्रपूर मध्ये चालक विरहित कारची निर्मित केली,हायड्रोजन धावणार
, बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (18:46 IST)
चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे 11 तरुणांनी ए आय तंत्रज्ञानावर आधारित 250 किलोमीटर वर 1 हायड्रोजनवर चालणारी कारची निर्मित केली आहे. या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट करवून दिली. फडणवीस यांनी या तरुणांचे कौतुक करून मदतीचे आश्वासन दिले आहे. 

चंद्रपूर आणि यवतमाळच्या वणी येथील 11 तरुणांनी मिळून हायड्रोजनवर चालणारी कारची निर्मिती केली आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे ही कार 1 किलो हायड्रोजन वर 250 किलोमीटर वर चालते आणि सर्व सुरक्षा संसाधनापासून लग्झरी सुविधा आहे. हर्षल नक्षी , जय विधाते, साहिल काकडे, वैभव मांडवकर, प्रज्वल जमदाडे आणि इतर तरुणांनी ही चालकाविरहित कार बनवली असून 250 किलोमीटर पर्यंत कार चालण्याचा दावा केला आहे. ही कार विशिष्ट असून ए आय तंत्रज्ञानावर आधारित आहे. 

ही कार त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी या तरुणांना शासनाची मदतीची आवश्यकता असून उपमुख्यमंत्री यांनी या कारची पाहणी केली असून त्यांना मदतीचे आश्वासन दिले असून त्यांचे कौतुक केले आहे. 
  
 Edited by - Priya Dixit    
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Cup: वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा पुतळा मॅच पूर्वी बसवणार