गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. तिच्या कार्यक्रमात नेहमीच गोंधळ होतो त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. चंद्रपुरात सावली तालुक्यात व्ह्याहडखुर्द गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. गौतमीने आपल्या नृत्याने तरुणांनाच नव्हे तर वृद्धांना देखील वेड लावले आहे. तिच्या कार्यक्रम बघायला प्रेक्षकांची खूप गर्दी असते. चंद्रपुरात गौतमीचा कार्यक्रम करण्यात आला होता. कार्यक्रम बघून घरी परत जाताना तीन अपघात झाले. या अपघात तिघेजण ठार झाले तर चार जण जखमी झाले आहे.
पहिला अपघात मोखाळाच्या कमलाई महाविद्यालयासमोर दुचाकी ट्रॅक्टरला धडकून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हरी सहारे आणि जयेश महाडोळे असे या मयत तरुणांची नावे आहे. तर आकाश नावाचा तरुण जखमी झाला.
दुसरा अपघात चंद्रपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी झाला.या अपघातात एक तरुणी जखमी झाली.
तर तिसरा अपघात खेडी फाट्याजवळ झाला. या अपघातात आष्टी येथील दाम्पत्य देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पतीचा मृत्य झाला तर पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाली.