वर्धा हा जिल्हा राज्यातील नैसर्गिक, भौगोलिकदृष्ट्या सुरक्षित असा आहे. यावर्षी २०१९ मध्ये जिल्ह्यात मागील 4 दशकात न पडलेल्या भीषण दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. यातून जिल्हा कारागृह देखील सुटलेले नाही. वर्धा कारागृहात 150 वर्षांमध्ये प्रथमच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वर्धा कारागृहाची स्थापना 1868 रोजी झाली. तेव्हापासून पहिल्यांदाच एवढी तीव्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. कारागृहात कैद्यांसाठी असलेल्या 3 विहिरी आणि शेतीसाठी असलेल्या 3 विहिरींचे पाणी पूर्ण संमले असून या सर्व कोरड्या पडल्या आहेत. सध्या कारागृहासाठी 3 टँकरची गरज आहे. मात्र 2 टँकरवरच सर्व कामकाज होते आहे. पाणीटंचाईने कारागृह शेतातील पिकेही पूर्णपणे नष्ट झाली असून, त्यामुळे टंचाईच्या काळात पाणी पुरवठा करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे दीडशे वर्षात कधीही पाणी कमी न होणाऱ्या या विहरी कोरड्या झाल्याने पाणी स्थिती खराब होणार असे चित्र आहे. या विहरी कधी आटत नसल्याने पाणी स्थिती चांगली राहील असे चित्र असे मात्र त्या कोरड्या पडल्याने अभ्यासक सुद्धा विचारात पडले आहे.