Palghar News : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आज, सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या अचानक झालेल्या भूकंपानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पण, अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची बातमी नाही.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी अधिकृत अहवालाचा हवाला देत सांगितले की, डहाणू तालुक्याला पहाटे 4.35 वाजता भूकंपाचा धक्का बसला. ते म्हणाले की, तालुक्यातील बोर्डी, दापचरी, तलासरी भागातील नागरिकांना पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले.