Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Earthquake Killari: किल्लारीला भूकंपाचा धक्का , रिश्टर स्केलवर 2.4 तीव्रता मोजली

Earthquake Killari: किल्लारीला भूकंपाचा धक्का , रिश्टर स्केलवर 2.4 तीव्रता मोजली
, रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (14:12 IST)
लातूरच्या कोयना भागात काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. आता शनिवारी मध्यरात्री किल्लारी भागात 2:07 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर तीव्रता 2.4  मोजण्यात आली.
 
 किल्लारीसह परिसरात शनिवारी मध्यरात्री दोन वाजून, सात मिनिटे व एकवीस सेकंदाला भूकंपाचा सौम्य धक्का नागरिकांना बसला. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल असून, भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात असल्याचे व या धक्क्याची खोली जमिनीत पाच कि.मी. अंतरावर असल्याचे लातूरच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 
 
तसेच किल्लारीसह भूकंपाचे झटके यळवट, सिरसल, कार्ला, कुमठा, सांगवी, तळणी, पारधेवाडी, नदीहत्तररगा, बाणेगाव, जेवरी, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावात गमावले. लातूर मध्ये 1993 साली प्रचंड विनाशकारी भूकंप आला होता. नागरिकांमध्ये त्या जुन्या आठवणी जाग्या झाला. भूकंपाचे धक्के जाणवल्यावर शनिवारी मध्यरात्री नागरिक घाबरून  घराच्या बाहेर पडले आणि त्यांनी कडाक्याची थंडी असून देखील रस्त्यावर रात्र जागून काढली. 
सुदैवाने कोणतीही जनधन हानी झाली नाही. 

Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात थंडीचा कडाका वाढला, सर्वत्र धुक्याची चादर पसरली