Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ खडसेंनी शिंदे गटाला अशा कडक शब्दात सुनावले

eknath khadse
, शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (09:56 IST)
जळगाव  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आणि शिंदे गटाला कडक शब्दात फटकारण्याचे काम सुरू केले आहे. खडसे म्हणाले की, “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?” असे म्हणत शिंदे गटावर घणाघात केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडे राजकारण कधी झाले नव्हते. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती असेही म्हटले आहे. यासोबतच धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे, असे म्हणत निशाणा साधला आहे.
 
खडसे पुढे म्हणाले की, राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यात झालेले फेरबदल जनतेला फार काही आवडलेले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती. निवडणुका विचाराने लढल्या जायच्या. अलीकडे हे सरकार पाडायच, ते पाडायचं हेच चाललं आहे” असं टीकास्त्र एकनाथ खडसे यांनी सोडलं आहे.

त्यातच आपल्या जिल्ह्यातील ५ आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली, घडवली. धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही” असंही खडसेंनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे.
 
खडसे म्हणाले की, आजपर्यंतचा इतिहास आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कधीही टीका केली. सरकारमध्ये असताना भाजपच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फॉक्सकॉन-वेदांता : महाराष्ट्राच्या हातातून 'या' कारणांमुळे निसटतायत प्रकल्प