Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदे गट मुंबईकडे रवाना; महाराष्ट्रात विधानसभेचं विशेष अधिवेशन उद्यापासून

eknath shinde
, शनिवार, 2 जुलै 2022 (19:30 IST)
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार गोव्यातून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.  सायंकाळी साडे सातच्या सुमारास बंडखोर आमदार विमानतळावर दाखल होणार आहेत. ते मुंबईत दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीत कॅबिनेट व राज्य मंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आल्यांनतर राज्य विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन येत्या 3 आणि 4 जुलैला बोलावण्यात आलं आहे.
 
या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी 3 जुलैला होणार असल्याचं विधान मंडळ सचिवालयानं कळवलं आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर फेब्रुवारी 2021 पासून विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे.
 
दरम्यान, गेल्या 11 दिवसांपासून सुरत, गुवाहाटी आणि गोव्यात असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईला रवाना झाले आहेत. कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमित ठाकरेंनी आरे कारशेड प्रकरणी शिंदे सरकारला सुनावलं