Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदे गुवाहाटीहून मुंबईला रवाना, 30 जूनला फ्लोर टेस्ट होणार

एकनाथ शिंदे गुवाहाटीहून मुंबईला रवाना, 30 जूनला फ्लोर टेस्ट होणार
, बुधवार, 29 जून 2022 (09:56 IST)
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे लवकरच मुंबईत परतणार असल्याचं बोललं आहे.मंगळवारी अनेक दिवसांनंतर मीडियासमोर आलेले एकनाथ शिंदे एकदम शांत  दिसत होते.आम्ही वेगळा पक्ष काढत नसल्याचे ते म्हणाले.आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत.गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आम्ही पुढे नेत आहोत.आमचे प्रवक्ते दीपक केसरकर पुढील रणनीतीची माहिती देतील, असे ते म्हणाले.एकनाथ शिंदे म्हणाले की, एकूण 48 आमदार आमच्यासोबत आहेत आणि एकत्र  आहेत. एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आहेत.त्यामुळे त्यांना अपात्र ठरवणेही अवघड झाले आहे. 
 
 भाजप या संपूर्ण प्रकरणात सावधपणे पाऊल टाकत आहे आणि सरकार स्थापनेचा आपला हेतू असल्याचे उघडपणे दाखवू इच्छित नाही.अशा परिस्थितीत त्यांना स्वत: किंवा एकनाथ शिंदे गटाकडून अविश्वास ठरावाची मागणी करायची नाही.अशा स्थितीत अपक्ष आमदारांना पुढे करून संपूर्ण रणनीती राबवली जाऊ शकते.दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत.याशिवाय बंडखोर आमदार एकनाथ शिंदेही राजधानीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. .
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra Political Crisis :एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह कामाख्या मंदिरात पोहोचले, म्हणाले- फ्लोर टेस्टसाठी उद्या मुंबईला जाणार