मुंबई : राष्ट्रवादी फुटीसंदर्भात ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात येणार आहे. शरद पवार गट अजित पवारांच्या शिवसेनेच्या फुटीबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यांचा आधार घेत शरद पवार गट निवडणूक आयोगात बाजू मांडण्याची शक्यता आहे. यामुळे आता अजितदादांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे..
विरोधी पक्षनेते असताना एका पत्रकार परिषदेत शिवसेनेत पडलेल्या फुटीबाबत म्हणाले होते. या संदर्भातील योग्य निर्णय आला नाही तर देशातील छोट्या पक्षांवर त्याचा परिणाम होईल. उद्या देशातील छोट्या पक्षांचे प्रतिनिधी काही कारणास्तव वेगळे झाले तर संबंधित पक्षावर ते दावा करतील उदा. राज ठाकरे यांच्या पक्षाचा केवळ एकच आमदार आहे. पुढे जाऊन त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर तो पक्ष संबंधित आमदारांचा समजायचा का? असे अजित पवार म्हणाले होते.
शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात अनेक महत्त्वाच्या बाबी मांडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड केले त्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत होते. त्यावेळी अजित पवारांनी शिंदेवर टीका केली होती. आता शरद पवार गट याच वक्तव्याचा आधार घेत अजित पवारांच्या अडचणीत वाढ करण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने नऊ मंत्र्यांविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केलेली आहे. मात्र या नऊ मंत्र्यांशिवाय ३१ आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. याशिवाय अजित पवार गटाने केलेले दावे देखील शरद पवार गटाने फेटाळले आहेत. २०२२ मध्ये जी राष्ट्रीय कार्यकारिणी झाली त्याचे देखील दाखले देण्यात आले आहेत. त्या प्रक्रियांचे पालन करत माहिती निवडणूक आयोगात दिली होती.
अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळले
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात पोहोचला असून त्याबाबत ६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत ही सुनावणी पार पडणार आहे. ६ तारखेच्या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडणार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसून शरद पवार हेच अध्यक्ष असल्याबाबत सांगण्यात आले आहे.