Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे- एकनाथ शिंदे

shinde panwar fadnavis
, बुधवार, 5 जून 2024 (19:41 IST)
आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मोकळे करावे अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींनी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते. मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला दोन लाखांहून अधिक मते मिळाली. संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोट बोला, रेटून बोला या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो. मोदी हटाव असा नारा विरोधक करत होते. मात्र मतदारांनी या विरोधकांना तडिपार केले.पराभवाची कारणमिमांसा केली जाईल."
 
ते पुढे म्हणाले, "गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले.या निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी मते वाढली आहे.देवेंद्रजी यांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन.अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही.जनतेची दिशाभूल करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरते यश आहे.आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचे दिसून आले."
 
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहे. ते राष्ट्रीय लोकशाहीआघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहे.त्यांनी या पूर्वी माध्यमांशी संवाद घातला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर आपले मत मांडले. ते म्हणाले, निवडणूक होत असते त्यात यश अपयश दोन्ही असते.

आजचे यश -अपयशमुळे आम्ही खचणार नाही.हे अपयश आमची सामूहिक जबाबदारी आहे. निवडणुकीत. निवडणुकीत जागा जरी कमी  जागा मिळाल्या तरीही काही ठिकाणी मते वाढले आहे.निवडणुकीत दिशाभूल करण्यात आली.चुकीचा प्रचार झाला. संविधान बदलण्याची भीती निर्माण करण्यात आली.

आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारे आहोत. मोदी जी आणि राज्य सरकार एक संघ म्हणून 
काम करतात. तर विरोधींचा अजेंडा मोदी हटाव चा आहे. देशातील जनतेनी पुन्हा मोदींना निवडून आणलं आहे. एनडीएला बहुमत मिळालं आहे. देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होणार. असे शिंदे म्हणाले. 
 
Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड