Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाळी अधिवेशनातच ६ जुलैला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

पावसाळी अधिवेशनातच ६ जुलैला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक
, रविवार, 4 जुलै 2021 (11:45 IST)
पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे. या अधिवेशनात गेल्या वर्षीपासून रखडलेली विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. ६ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
 
दरम्यान उद्या म्हणजेच ४ जुलैला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तर ५ जुलैला उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी ऑनलाईन पद्धतीने मतदार असलेल्या आमदारांना निवडणुकीत सहभागी होण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांच्या नावाला विरोध होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारी वरून काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला आहे.
 
पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईतील विधानभवानात पूर्व तयारी सुरू झाली आहे. अधिवेशनासाठी उपस्थित रहाणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस सुरक्षा रक्षक आणि पत्रकार या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याच आरटी-पीसीआर चाचणी करण्यासाठी आज आणि उद्या विधान भवनाच्या प्रांगणात राज्य सरकारकडून आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात असली तरी पावसाळी अधिवेशन कडक निर्बंधांसह येत्या ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे.
 
भाजप आमदारांची उद्या बैठक
विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या सर्व आमदारांची वसंत स्मृती येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपच्या सर्व 105 आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. भाजपच्या वसंत स्मृती या दादरच्या कार्यालयात संध्याकाळी ही बैठक पार पडणार आहे. दोन दिवसाच्या अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गृह विभागाचा नवा प्रस्ताव; आता पोलीस शिपाई सुद्धा उप निरीक्षक होणार !