एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हे दोन वेगळे विषय असून भीमा कोरेगावचा तपास राज्याकडेच असून एल्गारचा तपास केंद्राकडे दिला असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “माध्यमांनी एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव या विषयांची गल्लत घालू नये. भीमा कोरेगाव हा विषय दलित बांधवांशी निगडीत आहे. भीमा-कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही. या प्रकरणात दलित बांधवावर अन्याय झालेला आहे. त्यांच्यावर मी अन्याय होऊन देणार नाही. एल्गार परिषदेचा तपास केंद्राने काढून घेतलेला आहे. एल्गार परिषदेचा विषय दलितांशी निगडीत नाही. दोन्ही वेगळे विषय आहेत.”