Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 February 2025
webdunia

राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी देखील राज्यपाल कोश्यारी यांना डिवचले! पोस्ट राज्यभर व्हायरल

koshyari
, सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (21:04 IST)
विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आजच निरोप समारंभ पार पडला असून ते आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत. मात्र या अखेरच्या क्षणी देखील विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ट्वीटर हँडलवरून एक पोस्ट टाकण्यात आली असून यातून भगतसिंग कोश्यारी यांना लक्ष करण्यात आल आहे. या पोस्टची राज्यभर चर्चा झाली असून ती चांगलीच व्हायरल होत आहे.
 
ही आहे ती पोस्ट
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज देहरादूनकडे रवाना झाले आहेत. राजभवनावर त्यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. मात्र या पदावरील या शेवटच्या क्षणी देखील राष्ट्रवादीने त्यांना डिवचले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यामुळे राज्यातील विरोधीपक्षांनी त्यांच्या विरोधात रान उठवले होते.
 
आणि आता देखील राष्ट्रवादीने ते जाता, जाता त्यांना डिवचले आहे. त्यासाठी त्यांनी भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याचे एक उपहासात्मक मार्कशीट तयार करण्यात आली आहे. व्हॉट्सअप विद्यालयाची ही मार्कशीट असल्याचं त्यात दाखवण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केलेली मार्कशीट, त्याला प्रगती पुस्तक न म्हणता अधोगती पुस्तक म्हटलंय. त्यात विविध विषयांवरील त्यांची मार्क दाखवण्यात आले आहेत. यासोबतच पोस्टमध्ये एक पत्र देखील लिहिण्यात आले आहे. सध्या ही पोस्ट राज्यभर व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा