Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लेखक विश्वास पाटीलांवर गुन्हा दाखल करा

लेखक विश्वास पाटीलांवर गुन्हा दाखल करा
‘पानिपतकार’ म्हणून ओळखले जाणारे लेखक विश्वास पाटील आणि त्यांची पत्नी चंद्रसेना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सीईओ असताना, विश्वास पाटील यांनी नियमबाह्य पद्धतीनं दोन विकासकांना मदत केल्याचा आरोप आहे.
 
या प्रकरणातील रामजी शाह आणि रशेस कनकिया या दोन विकासकांना मालाडमधील प्रकल्पासाठी विश्वास पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मदत केली, अशी तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. त्यामुळे कोर्टानं विश्वास पाटील आणि पत्नीसह दोन्ही विकासकांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्जमाफीसाठी मोबाईल अॅप लाँच करणार