किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळ
, शनिवार, 19 मार्च 2022 (11:05 IST)
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे सध्या पत्रकार परिषद घेऊन आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. सध्या त्यांच्या रडारवर अनिल देशमुख, भावना गवळी, संजय राऊत, अनिल परब हे नेते आहे. किरीट सोमय्या यांनी आता एक नवीन ट्विट केले आहे. या ट्विट मुळे चांगलीच खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांच्या ट्विट मध्ये ते म्हणतात, "26मार्च - चला दापोली अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडू या " या ट्विट मध्ये त्यांनी अनिल परब यांना टार्गेट केले आहे. सोमय्या यांनी अनिल परब यांचे दापोलीचे हे रिसॉर्ट अवैध असल्याची टीका आणि आरोप आपल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. आता सोमय्या यांच्या नव्या ट्विटने चांगलीच खळबळ उडाली आहे.
या अगोदर देखील किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ, अजित पवार,भावना गवळी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
महाविकास आघाडीचे नेते भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा सूडबुद्धीने गैर करत असल्याचे म्हणत आहे.
पुढील लेख