अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा भरली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहविभागाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार आणि उत्पादन शुल्क ही खाती रोहित पवार यांच्याकडं दिली जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत अहमदनगरचे पालकमंत्रीपद भूषवण्यास हसन मुश्रीफ यांनी नकार दिल्याचं कळतंय. त्यामुळे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.