Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील; फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली

uddhav devendra fadnavis
, सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (08:46 IST)
उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा, अश्या कोपरखळ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिल्या आहेत. विकासकामांच्या श्रेयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच झापले आहे. मुंबईतील एका कार्यक्रम सभेत ते बोलत होते.
 
फडणवीस म्हणाले, मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केलं असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतलं असं म्हणणं हस्यास्पद आहे. उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
 
फडणवीस पुढे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय मला एक गोष्ट समजलीच नाही. आपण कोणतंही काम सुरू केलं तर काही लोक म्हणतात आमच्याच काळात झालं. अरे अडीच वर्षापैकी दोन वर्ष तर ते घरातच होते. दरवाज्याच्या आतच होते. अन् सहा महिन्यात त्यांनी मुंबई बदलून टाकली?, असा सवाल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
 
ते पुढे म्हणाले, कोणतंही काम घेतलं तर आमच्याच काळात सुरू झालं असं सांगतात. काही लोकांची सवय अशी असते की, अरे याचा प्रवेश झाला मीच केला. अरे नोकरी लागली, मीच लावली. अरे लग्न झालं मीच जुळवून दिलं. अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला. ही जी सवय आहे ती आता सोडली पाहिजे. आता पोरगा झाला हा त्याच्या कर्तृत्वाने झालाय. लग्न केलं तर त्याच्या पसंतीने केलं. मला वाटतंय, मीच केलं मीच केलं हे सांगण्याची ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. अरे तुमच्या काळात काहीच झालं नाही. म्हणून तर ही मुंबईची अवस्था झालीय, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकचा ब्लफमास्टर: मुथूट फायनान्सलाच घातला 2 लाखांचा गंडा; आठवड्यात दुसरा गुन्हा