पैशांचा आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावला

सोमवार, 2 डिसेंबर 2019 (15:11 IST)
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, असा गौप्यस्फोट भाजप नेते अनंत हेगडे यांनी केला आहे. हा निधी परत करण्यासाठीच ८० तासांचा मुख्यमंत्री व्हायचा ड्रामा करण्यात आल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला आहे. 
 
देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.'८० तास मुख्यमंत्री असताना शेतकरी मदतीचा ५ हजार कोटी रुपयांच्या निर्णयाव्यतिरिक्त कोणताही निर्णय झाला नाही. व्हॉट्सऍप फॉरवर्ड बातमीवर पुराव्यानिशी बोलणं केव्हाही योग्य. झालेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. असे पैसे केंद्र सरकार थेट देत नसतं आणि असा पैसा राज्य सरकार परत पाठवू शकत नाही,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख पंकजाच काय, अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात : राऊत