Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीमा कोरोगाव हिंसाचाराला फडणवीस सरकार जबाबदार

sharad panwar
, गुरूवार, 5 मे 2022 (21:40 IST)
भीमा कोरेगाव हिंसाचाराला तेव्हाचे देवेंद्र फडणवीस  सरकारच जबाबदार होते, असे वक्तव्य राष्ट्रवादी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चौकशी आयोगापुढे केले. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी आज शरद पवार (sarad pawar) यांची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी त्यांनी आयोगाने विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी वरिल सूचक वक्तव्य केले. तिसऱ्यांदा आयोगापुढे पवारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
 
पवार म्हणाले, भीमा कोरगाव हिंसाचार ही राज्यातील र्दुदैवी घटना होती. जोकही प्रकार झाला तो निंदनीय होता. जेव्हा परिस्थीती चिघळत होती तेव्हा ती पोलिसांना आटोक्यात येण्यासारखी होती. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लसख केले. ही परिस्थीती नियंत्रणात आणणे पोलिसांचे काम असतांना त्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही. पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर ती दंगल झाली नसती. पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे ती दंगल झाली. जेव्हा मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तेव्हा कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही राज्याची असल्याने पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. यामुळे पोलिसांन माहिती असूनही या दंगली झाल्या, असा दावा पवारांनी चौकशी आयोगापुढे केला.
 
दंगलीला फडणवीस सरकार जबाबदार
दंगली झाल्या तेव्हा भाजप सत्तेत होतं. तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी होती. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी दंगली थोपवीण्याची होती. अशा पद्धतीने शरद पवार यांनी थेट पोलिसांनाच यात जबाबदार असल्याच सांगत तत्कालीन फडणविस सरकारच जबादार आहे असे पवार यांनी न्यायालयाच्या खटल्यात सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिर्डीच्या मंदिरासंबंधी मुस्लिम समाजाची मोठी मागणी