Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फडणवीसांना मिळाली डॉक्टरेट पदवी

फडणवीसांना मिळाली डॉक्टरेट पदवी
, मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (19:27 IST)
Fadnavis received a doctorate degree नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. सार्वजनिक वाहतूक, पायाभूत सुविधांची माहिती घेण्यासाठी आणि महाराष्ट्रात एफडीआय आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी फडणवीस जपानच्या दौऱ्यावर आहेत.
 
जपानच्या कोयासन विद्यापीठाने आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची घोषणा केली. कोयासन विद्यापीठाचे डीन सोएदा सॅन यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
 
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांद्वारे जलसंधारण आणि सामाजिक समतेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी भारत दौऱ्यात त्यांना ही पदवी देण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Prakash Raj trolled 'फर्स्ट पिक्चर फ्रॉम मून'वरून प्रकाश राज ट्रोल झाले, आता स्पष्टीकरण देताना म्हणाले