Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फडणवीस-शिंदेंच्या टेस्ट ड्राईव्हची कार आहे ‘या’ बिल्डरची; चर्चा तर होणारच

devendra fadnavis eaknath
, सोमवार, 5 डिसेंबर 2022 (14:43 IST)
नागपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर रविवारी टेस्ट ड्राइव्ह घेतली. दोघांनी एकाच गाडीतून नागपूर ते शिर्डी प्रवास केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रवासाचे सारथ्य केले तर, मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. फडणवीस – शिंदेच्या या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाले. त्यानंतर, आता काँग्रेसने या गाडीच्या मालकावरुन सरकारला सवाल केला आहे.
 
समृद्धी महामार्गाचा उदघाटन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ११ डिसेंबरला होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमी महामार्गाच्या उदघाटनासाठी ते येणार आहेत. तत्पूर्वी रविवारी शिंदे-फडणवीसांनी या महामार्गावरील झिरो पॉइंटपासून प्रवास केला. नागपुरातून दुपारी १२.४५ वाजता प्रवास सुरू झाला आणि ४ तास २९ मिनिटांत, सायंकाळी ५.१४ वाजता ते शिर्डीला पोहोचले. फडणवीसांचे समृद्धी महामार्गावर कार चलावतानाचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी, फडणवीसांच्या हाती असलेल्या स्टेअरिंगने आणि कारने नेटीझन्सचे लक्ष वेधले. तसेच, ही कार कोणती आणि कोणाची? असाही प्रश्न अनेकांना पडला. आता, काँग्रेसने ट्विट करत या कारच्या मालकाचं नाव जाहीर करत राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे. तसेच, ही कार बिल्डरची असल्याचंही म्हटलं आहे.
 
महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये, फोटोवरून ही गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रकर या नावाने असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुनच, आता राज्य चालवायला बिल्डरच्या हाती देणार का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.
 
कुकरेजा मुळचे नागपूरमधील..
रिअल इस्टेट क्षेत्रातील कुकरेजा इन्फास्ट्रक्चर ही नावाजलेली कंपनी असून मूळ नागपूरमधील आहे. या कंपनीचे चेअरमन विरेंद्र कुक्रेजा हे आहेत. ते सध्या नगरसेवक असून नागपूरच्या जरीपटका प्रभागातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. १२ वर्षांपूर्वी त्यांच्या या कंपनीने रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. या कंपनीची कोट्यवधींची उलाढाल आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी विशेष फ्लायओव्हर