यवतमाळ जिल्हयात पावसाळयाच्या शेवटच्या महिण्यात पाऊस पडणे गरजेचे होते मात्र पाऊस न पडल्याने शेतातील सोयाबिनची अवस्था बिकट झाली आहे. या परिस्थितीत आता शेतक-यांना फक्त पिकविम्याच्या मदतीचा आधार राहणार आहे. त्यामुळे सरकारी यंत्रनेने ऑफिसमध्ये बसून सर्वेक्षण न करता शेतक-यांच्या समक्ष पिककापणी सर्वेक्षण करावे असे निर्देश खासदार भावनाताई गवळी यांनी कृषी विभागाला दिले आहे.
यवतमाळ जिल्हयात मागील वर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे मोठया प्रमाणात शेतक-यांनी कापूस सोडून सोयाबिनची लागवड केली. मात्र गेल्या एक महिण्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पाऊस न पडल्याने सोयाबिनच्या शेंगा तुलनेत कमी भरल्या आहे. पावसाअभावी लाखो शेतक-यांना पिकाचे उत्पन्न कमी होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातून झाला असून सरकारने पिकविम्याच्या माध्यमातून मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. सध्या जिल्हयात सोयाबिनची कापणी सुध्दा सुरु झाली आहे. आठ दिवसात या कामाला वेग येणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने जिल्हयातील कापणी करायचे ठिकाण, ज्या शेतात कापणी केली जाणार त्या शेतक-यांची नावे अशी संपुर्ण माहिती घोषीत करावी असे निर्देश सुध्दा खासदार भावनाताई यांनी कृषी विभागाला दिले आहे.
जीपीएस चा वापर करणार
यावर्षी कृषी विभागाला शेतातील सर्वेक्षण करतांना जीपीएस चा वापर करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. एका विशिष्ट अॅप च्या आधारे हे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अॅपचा वापर शंभर टक्के होईल काय तसेच संपुर्ण पारदर्शकता राहील काय याबाबत सांगने कठीन असल्यामुळे कुठल्याही यंत्राचा वापर केला तरी सर्वेक्षण शेतक-यांच्या समक्ष करा असे निर्देश खासदार भावनाताई गवळी दिले आहे.