Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईतील साकीनाक्यात भीषण अग्नितांडव

fire
, सोमवार, 27 मार्च 2023 (13:34 IST)
मुंबईतील साकीनाका भागात आज पहाटे एका हार्डवेअरच्या दुकानात आग लागली साकीनाका झोपडपट्टीचा भाग आहे. पहाटे लागलेल्या हार्डवेअरच्या दुकानात आग लागली त्यावेळी सर्व झोपेत होते. या अग्निकांडात दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हे दोघे दुकानावर कामाला होते. आग लागली तेव्हा दुकानात सुमारे 11 कामगार झोपलेले होते. 11 पैकी 9 जणांना सुखरूप काढण्यात यश मिळाले तर दोघांचा होरपळून मृत्यू झाला. राकेश गुप्ता आणि गणेश देवासी असे या मयतांची नावे आहे. अंधेरीत साकीनाका मेट्रोस्टेशन जवळ हार्डवेअर आणि इलेक्ट्राँनिक्सची दुकान आहे. पहाटे दुकानांना आग लागली काहीच वेळात आग पसरली आणि दुकानाला आगीच्या विळख्यात वेढले. आग लागली तेव्हा दुकानात कामगार झोपले असता त्यात कामगार बाहेर पळाले  नंतर तीन अडकून राहिले त्यापैकी दोघांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.आग लागल्याची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आणि अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले.   

राजश्री साकीनाका भागातील दुकानाला आज पहाटे आग लागली. तातडीने अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या सुमारे अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. नंतर काही वेळा नंतर पुन्हा पहाटे पाचच्या सुमारास आगीतून भडका झाला नंतर अग्निशमन दलाचे 8 ते 10 बंब घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या अग्निकांडात परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत.आगीमुळे दोन दुकाने जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस शोध घेत आहे. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे.
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नावरून परतताना अपघातात चौघांचा मृत्यू