Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहिल्याच दिवशी शिर्डी विमानतळावरील विमानसेवा रद्द

पहिल्याच दिवशी शिर्डी विमानतळावरील विमानसेवा रद्द
शिर्डी ‍आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घघाटन होऊन चार दिवस होत नाहीत, तोच शिर्डी विमानसेवेचा गोंधळ सुरू झाला. पहिल्याच दिवशी विमान रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळांबा झाला आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांना हैदराबादला घेऊन जाणारे अलायन्स एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आले. हे विमान रद्द झाल्याची माहिती बराच वेळ प्रवाशांना देण्यातच आली नाही.
 
या विमानाने 52 भाविक हैदराबादला परत जाणार होते. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास विमानाने टेकऑफ करणे अपेक्षित होते. त्यासाठी प्रवासी विमानात बसलेही. पण पुढचे चार तास प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली नाही. 
 
चार तासांनी प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. तांत्रिक कारणामुळे विमान रद्द झाल्याचे सांगण्यात आले. पण इतका वेळ अलायन्स एअरलाईन्सने प्रवाशांना नीट माहिती न देता उद्धट भाषेत उत्तरे दिली. विमानतळावर खाण्यापिण्याचीही योग्य सोय नव्हती. त्यामुळे प्रवाशांना मन:स्ताप झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट