Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोर्टाचे आदेश पाळा, अन्यथा जनआंदोलन केले जाईल: नितेश राणे

nitesh rane
, गुरूवार, 21 डिसेंबर 2023 (19:58 IST)
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक तेढ निर्माण होत आहे. अनधिकृत भोंगे, कोर्टाचे आदेश आहे. हिंदू धर्माला जसे कायदे आहे, तसे इतर धर्मांना आहे. फक्त हिंदू धर्माने नियम पाळावे इतरांनी ते पळू नये असे चालणार नाही. माझं आवाहन आहे कोर्टाचे आदेश पाळा. अन्यथा जनआंदोलन केले जाईल असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाशिकमध्ये दिला.
 
यावेळी त्यांनी नाशिकमध्ये येण्याचे सामाजिक कारण सांगितले. साने गुरुजी यांच्या नावाने स्थापन झालेल्या संस्थेच्या वर्धापन दिनाचे आमंत्रण होते. त्यासाठी मी आलो आणि त्यांना पाठिंबा दिला.
 
यावेळी त्यांनी डिपार्टमेंट काही सडके द्राक्ष आहे, हे हिंदूंचे सरकार आहे, अन्यथा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. भद्रकालीचा विषय मी सभागृहात घेतला. रात्री बे रात्री रेस्टॉरंट आणि बार चालवले जातात. बाईकच्या मागच्या सीटमध्ये ड्रग्ज ठेवले जाते, त्याचे व्हिडीओ माझ्याकडे आहे. गजेंद्र पाटीलचे मी नाव घेतले, त्या पीआय वर कारवाई झाली.
 
यावेळी महापालिका आयुक्तांना त्यांनी इशारा दिला. खुर्चीवर कशासाठी बसवले आहे. परत परत सांगायला लावू नका. तुम्ही दाढ्या कुरवाळत बसू नका, अधिवेशनात तुम्हाला अनुभव आला असेल. अतिक्रमण बाबत ज्या तक्रारी आल्या आहेत तिथं कारवाई करणार नसाल तर तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे याबाबत वरिष्ठांशी बोलावे लागेल असेही ते म्हणाले. लँड जिहाद सुरू आहे, जन आंदोलन उभं करत असेल तर हिंदू समाजाच्या मागे आम्ही आहोत असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे, संजय राऊत, सुधाकर बजगुजर यांच्यावरही टीका केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मालेगावमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होणार का? पहा काय झाले अधिवेशनात वाचा पूर्ण रिपोर्ट