Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Milind Ekbote: आंदोलन करणं भोवल! मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Milind Ekbote
, मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (14:58 IST)
Milind Ekbote:हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना पुणे महापालिकेसमोर मोर्चा काढत आंदोलन करणे महागात पडले आहे. बेकायदेशीर आंदोलन केल्यामुळे मिलिंद एकबोटे यांच्यासह भाजपचे आमदार नितेश राणे, भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे या तिघांवर पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मिलिंद एकबोटे यांनी 4 सप्टेंबर रोजी पुण्यातील एका मंदिराच्या अतिक्रमणाविषयी महापालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्च्यात आई भवानी शक्ती दे, पुणेश्वर मुक्ती दे, जय श्रीराम अशा घोषणा लावण्यात आल्या. तर आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी काही वादग्रस्त विधाने केली. त्यांनी दिलेली भाषणे हे समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचा आरोप अनेकांनी केला. 

या भाषणावरून मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या असून मिलिंद एकबोटे, नितेश राणे आणि महेश दादा लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अन्यथा पुण्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलिसाना देण्यात आला आहे. मुस्लिम संघटनांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत निवेदन दिले.त्यांनतर त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Karnataka : घटस्फोटित महिलेला फसवून बाळ विकले