Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंडे यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंडे यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाकडे  तक्रार
, बुधवार, 13 जानेवारी 2021 (22:07 IST)
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे  तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्य आणि मालमत्ते बाबतची माहिती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर मुंडे यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी केली आहे.
 
भाजप नेते किरीट सोमय्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. या तक्रारीत धनंजय मुंडे यांनी २०१९च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्य आणि मालमत्ते बाबतची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचे भाष्य, पोलिसांनी सत्य बाहेर आणावे