Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

अहमदनगरात शॉक लागून चौघा भावांचा दुर्देवी मृत्यू

current shock
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (23:43 IST)
अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात येठेवाडी येथे विजेच्या ताराला चिटकून एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दर्शन, विराज, अनिकेत, ओंकार बर्डे असे या मयत चिमुकल्यांचे नावे आहेत. हे चौघे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. शाळा सुटल्यावर हे चौघे घरी गेले आणि घरा जवळ खेळात होते. दुपारी खंदरमाळवाडी गावातील वांदरकडा येथे छोट्या तळ्यात अंघोळीला गेले असता तळ्यावरील गेलेल्या वादळी वाऱ्याने तुटलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून चौघांचा दुर्देवी अंत झाला. चिमुकल्यांचा मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Women's Asia Cup T20: शेफाली वर्माने महिला T20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला