Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 7 October 2025
webdunia

संभाजी नगर मध्ये दारू पिऊन गाडी चालवत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Car Accident
, शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (16:25 IST)
महाराष्ट्रातील संभाजी नगर येथे भीषण अपघात घडला आहे. दोन कारमध्ये झालेल्या भीषण टक्करमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताचा व्हिडीओ समोर लागलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.या व्हिडीओ मध्ये दोन कार समोरासमोर धडकताना दिसत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी नगर येथे एका मद्यपीला ड्रायविंग लायसेन्स शिवाय गाडी चालवण्याची संधी दिली. त्याने वेगाने कार चालवली आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार समोरून येणाऱ्या वाहनाला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील चोघांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या दोघांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 
Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलाला विवस्त्र करून रात्रभर डान्स केला, लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल