Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा अपघाती मृत्यू झाला

accident
, बुधवार, 25 जानेवारी 2023 (21:55 IST)
बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आंध्रप्रदेशातील माध्यमांनी दिली आहे.
 
दरम्यान, पोलिसांनी दिलेली माहितीनुसार मागील दोन दिवसापूर्वी जुळे सोलापुरातील नऊ जण तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी सोलापुरातून कारमधून गेले होते. बुधवारी तिरूपतीचे दर्शन घेऊन कनिपमकडे जात असताना अचानक कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली.
 
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही, आमची युती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी आहे