सध्या पेट्रोल,डिझेलचे,गॅस,सीएनजी च्या भावात वाढ झाल्यामुळे आता एसटी महामंडळाने देखील भाडे वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.अद्याप एसटी देखील सुरळीतपणे सुरु नाही.त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे .
सध्या कोरोनाचे प्रादुर्भाव जरी कमी झाले आहेत,तरीही कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नाही.त्यामुळे काही राज्यात लॉक डाऊन चे निर्बंध अद्याप लागलेले आहे. त्यामुळे अनेक मार्गासाठी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.याचा वर निर्णय घेऊन एस टी महामंडळ आता प्रवासासाठी तिकीट दरांमध्ये मोठी वाढ करण्याचे निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांवर होणार असल्याचे वृत्त समजले आहे.