Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात ढोल ताशा पथकासाठी नवीन नियमावली लागू

पुण्यात ढोल ताशा पथकासाठी नवीन नियमावली लागू
, शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (17:13 IST)
पुण्यामध्ये पोलिसांनी ढोल ताशा पथकासाठी नवीन नियमावली लागू करण्यात येत आहे. गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या पथकामध्ये जास्तीत जास्त 52 वादकच असावेत असं पोलिसांनी म्हटलं आहे. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत तीन ढोल ताशा पथके असतील, तर अन्य मंडळाच्या मिरवणुकीत फक्त दोन पथके असतील असंही पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या निर्णयामुळे ढोलताशा पथकांनी नाराजी व्यक्त करत लवकरच ढोलताशा महासंघाने यासंदर्भात एक बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असं महासंघातर्फे सांगण्यात आलं आहे.
 
पुणे शहरातील गणपती मिरवणुकांमध्ये ढोलताशांच्या पथकांची संख्या मोठ्या प्रमाणत असते. आपल्या वैविध्यपूर्ण वादनाने पुण्याची ढोल ताशा पथकं पुण्यातच नाही तर देश विदेशातही प्रसिद्ध आहेत. एका तालात, एका सुरात ढोल ताशा बडवताना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडत असते. यंदा पोलिसांनी प्रत्येक ढोल पथकांमध्ये  25 ढोल वादक,7 ताशा वादक, 4 झांझ वादक असावेत अशी मर्यादा घालून दिली आहे. पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मी रोडवर पथकाला एकदाच ढोल-ताशे वाडवण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'त्या' नोटा बदलून मिळणार, आरबीआयची प्रस्तावाला मंजुरी